Friday, July 1, 2011

अजब मधुचंद्राची गजब कहाणी






अजब  मधुचंद्राची  गजब  कहाणी

नवीन विनोदी मालिका: १ जुलै पासून शुक्रवार - शनिवार रात्री .३० वाफक्त झी मराठीवर

मधुचंद्राच्या प्रत्येकाच्या आठवणी निरनिराळ्या असतात. प्रत्येक प्रकारची व्यक्ती मग ती डॉक्टर  असो  अथवा  व्यावसायिक  आपापल्या  परीने  त्याची  तयारी  करते आणि जेव्हा दोन भिन्न किवां अगदी विरुद्ध टोकाची  व्यक्तिमत्वे समोरासमोर येतात तेव्हा मात्र काय धमाल उडते, याची कहाणी म्हणजेच 'मधु इथे अन् चंद्र तिथे'. 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' या न्यायला अनुसरून  लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याची या विषयावर एक स्वतंत्र कहाणी असते.  आणि  म्हणूनच  कायम वलय प्राप्त झालेल्या या विषयाला नर्मविनोदी पद्धतीने झी मराठी 'मधु इथे अन् चंद्र तिथे' या मालिकेतून रसिकांना पेश केले जाणार आहेत. 'मधु इथे अन् चंद्र तिथे' या मालिकेद्वारे झी मराठीवर लोकप्रिय विनोदी दिग्दर्शक केदार  शिंदे पुनरागमन करत आहेत. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' आणि 'घडलंय बिघडलंय' नंतरहसवत हसवत  विषयाचे गांभीर्य पोहोचवण्यात माहीर असलेले केदार शिंदे पुन्हा एकदा एक वेगळा धमाल विषय रसिकांसमोर घेऊन येत आहेत
मराठी  चित्रपट  सृष्टीतील  आणि  मालिकांमधील  अनेक  मातब्बर  नावे  या  मालिकेमधून  आपल्या  भेटीला येणार आहेत.  यामध्ये  भरत  जाधव, नेहा पेंडसे, क्षिती जोगनिखील  रत्नपारखीअमृता  सुभाषपुष्कर  श्रोत्रीउमेश  कामतमृण्मयी  देशपांडेजितेंद्र जोशी, गिरीजा ओक इत्यादी तगडी कलाकार मंडळी  यामध्ये  दिसतीलविशेष  म्हणजे प्रत्येक भागात एक नवीन कथा  असेल आणि  वेगवेगळ्या  'मधुचंद्राच्यातऱ्हा या  मालिकेच्या  भागांतून  पाहायला मिळतीलएकाच  मालिकेतून  इतके  सारे  दिग्गज कलाकार दिसण्याची  ही  पहिलीच  वेळ
'मधु इथे अन् चंद्र तिथे' या मालिकेतील  मूळ कथा  द्वारकानाथ  संझगिरी  यांनी  लिहिल्या  असून  मालिकेसाठी  ते पहिल्यांदाच लेखन करीत आहेत.  केदार  शिंदे  आणि  ओमकार  शिंदे  यांनी  या  मालिकेसाठी  पटकथा  आणि संवाद लिहिले असून केदार शिंदे या मालिकेचे दिग्दर्शन करीत आहेत.  
मधुचंद्राच्या मजेदार कथा 'मधु इथे अन् चंद्र तिथे' - जुलैपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री .३० वा. फक्त झी मराठीवर.



No comments:

Post a Comment