Sunday, May 22, 2011

झी टॉकीजवर बाल-धमाल चित्रपट महोत्सव

झी टॉकीजवर बाल-धमाल चित्रपट महोत्सव
२३ मे ते २८ मे : छोट्या दोस्तांसाठी संपूर्ण आठवडाभर धमाल चित्रपटांची लयलूट

मे महिना म्हणजे आपल्या छोट्या दोस्तांचा धमाल करण्याचा हक्काचा महिना. संपूर्ण वर्षभर शाळा, क्लासेस आणि  परीक्षा या सगळ्यांमधून सुटका होऊन मुक्तपणे आपल्याला हवे ते करण्याचा काळ. अशा या धमाल सुट्टीच्या दिवसांत खास आपल्या छोट्या दोस्तांसाठी झी टॉकीजने आणला आहे - "बाल  धमाल चित्रपट महोत्सव" . २३ मे ते २८ मे च्या दरम्यान   संपूर्ण आठवडाभर दुपारी १२.०० वा. एकापेक्षा एक  मस्त  चित्रपट झी टॉकीजवर दाखवण्यात येणार आहेत.  

या  महोत्सवाची  सुरुवात  नाना  पाटेकर  आणि  सक्षम  कुलकर्णीच्या 'पक पक पकाक' ने होत  असून  सोमवार  २३ मे  रोजी  हा चित्रपट दाखवला जाईल. नाना पाटेकरची दमदार भूमिका आणि सक्षम कुलकर्णीचा  खोडकर चिखलू प्रेक्षकांना चांगलाच भावला होता, तसेच नारायणी शास्त्रीने या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण केले होतेगौतम जोगळेकर यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.

मंगळवार २४ मे रोजी,  महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार (२००८) चा  मानकरी  ठरलेला  तसेच उत्कृष्ट  कथा, पटकथा  आणि  दिग्दर्शनाची  राष्ट्रीय  तसेच  आंतराष्ट्रीय  नामांकने      पुरस्कार  मिळवलेला मंगेश  हाडवळे दिग्दर्शित , 'टिंग्या' झी टॉकीजवर  पाहायला  मिळेल. 'टिंग्यामध्ये प्रमुख  भूमिकेत असलेला  शरद  गोयेकर  याला  या चित्रपटातील  भूमिकेसाठी  उत्कृष्ट  बाल  कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला  होता.  'टिंग्या'ची कथा एक शेतकरी, त्याचा मुलगा आणि त्यांचा बैल यांच्या भोवती फिरते. आजारपणामुळे निकामी झालेला बैल कत्तलखान्यात विकण्याचा निर्णय जेव्हा शेतकरी घेतो तेव्हा त्याचा मुलगा टिंग्या त्याला विरोध करतो  आणि  आपल्या  लाडक्या  बैलाला  वाचवायचा हरएक प्रयत्न करतो, अशी टिंग्याची थोडक्यात कथा. पण याचे सुंदर आणि हृदयद्रावक चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते. अजिबात चुकवू नये असा हा सुंदर चित्रपट आहे.

आईवडिलांच्या अपेक्षांचे ओझे पेलू शक्यामुळे आलेले नैराश्य तसेच बालपणीचे मोलाचे क्षण हरवल्यामुळे मुलांना होणारा त्रास याचे चित्रण २५ मे रोजी दाखवल्या जाणाऱ्या 'मिशन चॅम्पियन' मध्ये पाहायला मिळेल. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सुबोध भावे, शर्वरी जमेनीस,अनुराग वरळीकर, अतुल परचुरे इत्यादी तगडे कलाकार आहेत.

एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात कसा आमुलाग्र बदल घडवू शकतो आणि एका खोडकर मुलाचे आयुष्य कसे मार्गी लावू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'जिंकी रे जिंकी' हा चित्रपट. गुरुवार, २६ मे रोजी हा चित्रपट पाहायला मिळेल. भाऊ गावंडे यांच्या 'प्रकाशाच्या उंबरठ्यावर' या पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला असून प्रत्येक शाळेत जाणऱ्या मुलाने पाहायला हवा असा हा चित्रपट आहे.

२७ मे रोजी दाखवला जाणारा छडी लागे छम छम या चित्रपटात देखील आपल्या शिक्षण पद्धतीची आजची स्थिती दाखवण्यात आली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यामधले वास्तववादी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळेल.

या चित्रपट महोत्सवाची सांगता २८ मे रोजी दाखवल्या जाणाऱ्या 'एवढंसं आभाळ' या संवेदनशील चित्रपटाने होणार आहे. नवरा बायकोच्या बिघडलेल्या संबंधांचा मुलांवर कसा वाईट परिणाम होतो आणि कशा पद्धतीने तो रुक्ष आणि आक्रमक होत जातो, आतून तुटत जातो याचे अतिशय भावूक चित्रण या चित्रपटातून दाखवले गेले आहे. प्रतीक्षा लोणकर आणि हर्ष छाया हे दोघे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

बाल धमाल चित्रपट महोत्सवातील प्रत्येक चित्रपट केवळ मुलांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनी देखील आवर्जून पाहावा असाच आहे. तेव्हा तयार व्हा सुट्टीतील धमाल एन्जॉय करण्यासाठी फक्त झी टॉकीजवर.

Tuesday, May 10, 2011

Zee Marathi presents 'Fu Baai Fu Season 3' May 11, 2011



Fu Baai Fu, a sure shot laughter dose from Zee Marathi is back with its fresh season, this time with new format, new contestants and of course with bigger humor. Started with "Vinod Motha Zalay" (Humor is bigger now), the show is promising a laughter ride like never before.

In this season, the contestants are the big names in the industry, well known for their comic presence in films and different popular plays.  Majorly from Marathi theaters and television, all the contestants guarantee the ROFL weekdays. First time in the history of Marathi television, such big names are coming together on the same platform. So who are these people? Satish Tare-Bhalachandra Kadam; Santosh Pawar-Kishori Ambiye; Kushal Badrike-Hemangi Kavi; Mangesh Desai-Bhargavi Chirmule, Santosh mayekar-Priya Berde; Sunil Tawade-Atisha Naik; Atul Todanakr-Snehalata Tawade; these are the names in this season who are all set to rode people on laughter express. Apart from these pairs, Vaibhav Mangale and Anand Ingale will ensure to fire laughter crackers throughout the season. Our very own Nilesh Sable is back as a host with this season.

Renuka Shahane, the popular actress from Hindi and Marathi films will act as a judge for the first time on TV along with Nirmiti Sawant.

Fu Baai Fu will telecast from 11th May 2011, every Wednesday and Thursday @ 9.30 PM, only on Zee Marathi.

Friday, April 29, 2011

झी टॉकीजवर मे मध्ये सदाबहार मनोरंजनाची बरसात !


                                    




संपूर्णपणे  मराठी चित्रपटांना वाहून घेतलेली  मराठीतील एकमेव वाहिनी म्हणजेच झी टॉकीज. मराठी चित्रपटप्रेमींसाठी  झी टॉकीजवर  मे महिन्यांत वेगवेगळ्या चित्रपट महोत्सावांद्वारे रसिकांसाठी बहारदार मनोरंजाची मेजवानी पेश केली जाणार आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच  तब्बल दोन चित्रमहोत्सव रसिकांच्या भेटीस येत आहेत ते म्हणजे "महाराष्ट्र सप्ताह" आणि "मस्त मस्त भरत विक". "महाराष्ट्र सप्ताह" मध्ये महाराष्ट्राची संस्कृती,महाराष्ट्राचा इतिहास उलगडून दाखवणारे चित्रपट १ मे ते ७ मे दरम्यान दुपारी   १२.००   वाजता  दाखवण्यात येणार आहेत. या सप्ताहाची सुरुवातच महेश  मांजरेकर  यांच्या  'मी  शिवाजीराजे  भोसले  बोलतोय' ने  होणार असून त्यानंतर 'राजा शिवछत्रपती' (२ मे); 'मराठा तितुका मेळावा'(३ मे); 'शिवरायांची सून ताराराणी (४ मे); विष्णुपंत  पागनीस यांचा  संत  तुकाराम (५ मे); 'शाब्बास सुनबाई'(६ मे)आणि  या  सप्ताहाची  दमदार  सांगता  करण्यासाठी शनिवार ७ मे रोजी, दुपारी  १२ वा.- भारतात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळके  यांची अनोखी कहाणी सांगणारा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर  गौरवला  गेलेला  सुपरहिट मराठी चित्रपट "हरिश्चंद्राची फॅक्टरी" दाखवला जाणार आहे. 

"मस्त मस्त भरत विक" मध्ये  मराठी चित्रपटांचा सुपरस्टार भरत जाधव याचे मस्त चित्रपट  २ मे ते ७ मे दरम्यान संध्याकाळी    ६.३०    वाजता रसिकांना पाहायला मिळतील. यामध्ये जत्रा (२मे) ; पछाडलेला (३मे); ह्यांचा काही नेम नाही (४मे);माझा नवरा तुझी बायको (५मे) ;मुंबईचा डबेवाला (६ मे) आणि भरत, मकरंद  यांच्याबरोबरच  अशोक सराफ  यांची धमाल  जुगलबंदी  असलेला  'साडे माडे तीन'  (७ मे)  इत्यादी  चित्रपट पाहायला मिळतील.   

झी टॉकीजवर मे महिन्यापासून 'एक ब्रेक एक्स्प्रेस' मध्ये दर रविवारी दुपारी ३.०० वा. केवळ एका ब्रेकमध्ये एक लोकप्रिय सुपरहिट चित्रपट सलग पाहायला मिळेल. यामध्ये गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (८ मे); अशी ही बनवाबनवी (१५ मे) ; बे दुणे साडेचार (२२ मे) आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२९ मे) हे चित्रपट पाहायला मिळतील.

तसेच टॉकीज प्रिमीअर मध्ये मे मध्ये, आजच्या जमान्यातील तरुणांवर आणि इंटरनेटवरून जुळणाऱ्या लग्नावर भाष्य करणारा "सावरिया डॉट कॉम" हा चित्रपट पाहायला मिळेल १५ मे रोजी दुपारी १२.०० वा.

मे महिना म्हणजे शाळेतील मुलांसाठी  धमाल करण्याचा  हक्काचा महिना. हे लक्षात घेऊनच झी टॉकीजवर आपल्या छोट्या दोस्तांसाठी काही खास चित्रपट २३ मे ते २८ मे दरम्यान "बाल  धमाल चित्रपट महोत्सव" मध्ये दुपारी १२.०० वा. दाखवण्यात येणार आहेत. यामध्ये पक पक पकाक (२३ मे); टिंग्या (२४ मे); मिशन चॅम्पियन (२५ मे); जिंकी रे जिंकी (२६ मे); छडी लागे छम छम (२७ मे) आणि एवढंसं आभाळ (२८ एप्रिल) या चित्रपटांचा समावेश असेल. 

एप्रिल महिन्यापासून सुरु झालेल्या 'तिसरी घंटा' या सदरात लोकप्रिय नाटकं दाखवली जातात.मे महिन्यामध्ये 'तिसरी घंटा' हे सदर दर शनिवारी रात्री ९.३० वाजता प्रसारित होईल. यामध्ये हवाहवाई (७ मे) ; शु कुठे बोलयाचे नाही (१४ मे) ; जादू तेरी नजर (२१ मे) आणि चार दिवस प्रेमाचे (२८ मे) ही नाटके दाखवण्यात येतील.   

त्याशिवाय टॉकीज थरार, टॉकीज जल्लोष, मालामाल मंडे, संडे ब्लॉकबस्टर या मध्ये देखील अनेक जुने नवे लोकप्रिय चित्रपट दाखवले जातील.

Wednesday, April 27, 2011

Ekapeksha Ek - Apsara Ali is on its way to finale - 1 May 2011



Zee Marathi's highly acclaimed dance reality show Ekapeksha Ek Apsara Ali is now in its final stage. The winner Apsara will be chosen from four finalists Girija Oak, Neha Pendse, Mrunmayee Deshpande and Urmila Kanetkar.

The journey started with nine Apsaras and with the competition getting fierce and progressing towards finale, only four finalists are left. The contestants for this season were all well known celebrities from Marathi Film and Television Industry and to ensure best grooming of these contestants, and bring out the best in them we had Mayur Vaidya, Fulva Khamkar and Dipali Vichare, who are one of the most prominent choreographers from the industry. While mentoring to our Apsaras, all three choreographers acted as a friend, philosopher and guide to them. And finally, to judge these talented individuals, we have our own Mahaguru, Sachin Pilgaonkar. The show was hosted by Pushkar Shrotri, a funny man in his own charming style.

In this journey of emotions, battle and of course the incredible dances, no apsara left any stone unturned.  But finally, from the selective 9, we have our fantastic four Mrunmayee Deshpande, Girija Oak, Neha Pendse and Urmila Kanetkar who have made their ways to the finale.

This celebrity dance reality show was not just about dance, but it was a show of glamour, beauty and elegance. The show presented a classy feel to the audience of Zee Marathi.
The show is already a benchmark in the world of reality and a great treat to every dance lover. But when it comes to finale, the viewer will experience the dance, the competition, the glamour, the passion - as been never seen before!

The finale will be telecasted on the occasion of Maharashtra Day i.e. on Sunday, 1st May @ 7.30 pm onwards only on Zee Marathi.

Sunday, April 10, 2011

Let’s rejoice for the newly wedded couple Abhijit – Shamika from “MAZIA PRIYALA PREET KALENA”

Crossing all barriers, the most loved couple from Marathi Television has finally tied a knot. This union happened with blessing from their respective families and well wishes from our dear audience on Saturday, 9th April.

Mazia Priyala Preet Kalena has a huge fan following, especially in youth because of its fresh look and modern appearance. Both Abhijit & Shamika got tremendous love from people and waiting eagerly for their union. Ekta Kapoor’s Balaji Productions made their debut with this serial in Marathi regional space.
Zee Marathi innovatively promoted this wedding. To make this wedding very interactive and innovative, Zee Marathi took some creative steps to promote the Wedding. One whole week of celebration right from sangeet to final vows was organized for this grand wedding.
The couple got engaged on the auspicious occasion of Gudi Padwa. On ground the couple personally invited the audience by distributing their wedding invites in various places in Mumbai and Thane.
To gain highest interaction, Zee Marathi conducted an SMS Ukhana contest (witty lines incorporating names of the bride and bridegroom), which got a huge response from viewers. 25 lucky women got an opportunity to participate in wedding shoot. The wedding happened on a grand scale but in an authentic Maharashtrian way.
Do shower your love and bless the newly wedded couple for their happy married life. Keep watching Mazia Priyala Preet Kalena ; every Mon – Sat @ 8.00 pm,  only on Zee Marathi.