Saturday, May 28, 2011

ताजी टवटवीत प्रेमकथा आभास हा...


ताजी टवटवीत प्रेमकथा  आभास हा...
सोमवार ३० मे पासून फक्त झी मराठीवर
वैविध्यपूर्ण संकल्पना आणि टवटवीत विषय घेऊन झी मराठी नेहमी आपल्या प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजन देते. यावेळी आणखी एक नवी, ताजी, उत्फुल्ल, प्रेमकथा झी मराठीवर दाखल होतेय. 'आभास हा' ही ती मालिका असून येत्या ३० मे पासून सोमवार ते शनिवार रात्री .३० वा. ती रसिकांसमोर येतेय. ही कथा आहे .. प्रेमाची, अनोख्या नात्याची, त्यागाची आणि सुडाचीही. मनात आणलं तर  कुणालाही जग जिंकता येतं. जग जिंकण्यासाठी सत्ता, पैसा, अधिकार यांची गरज नाही तर त्यासाठी भावनेचा ओलावाही खूप आहे. 'प्रेम' या दोन अक्षरांमध्येच ती जादू आहे.
'आभास हा' ची नायिका आर्या ही अशीच प्रेमळ, निरागस आणि अत्यंत हळवी. जगातल्या प्रत्येक गोष्टींवर जीवापाड प्रेम करणारी. ती अल्लड आहे, स्वछंदी आहे, भाबडी आहे तितकीच ती आपल्या मतांबाबत आग्रही आहे, ठाम आहे. जीवनाबद्दलचा तिचा दृष्टीकोण अत्यंत सकारात्मक आहे. आपल्या वागण्याबोलण्यातून समोरच्याला ती सहज जिंकून घेते. ती जितकी स्वप्नाळू तितकाच तिचा भाऊ विश्वमोहन जयवंत व्यावहारिक.

विश्वमोहन हा एक अत्यंत श्रीमंत बिझनेसमन. आपल्या प्रत्येक कामाच्या बाबतीत अत्यंत करारी असणारा विश्वमोहन आपल्या बहिणींच्या,   मैथिली आणि आर्याच्या बाबतीत एकदम हळवा आहे. आईवडिलांच्या  मृत्यूनंतर  या  दोन्ही  बहिणींना  अत्यंत लाडात  त्याने  वाढवले  आहे. आपल्या बहिणींना तळहाताच्या फोडाप्रमाणे विश्वमोहनने जपलेय. मैथिलीचे लग्न त्याने एका सुखवस्तू कुटुंबातील मुलाबरोबर ठरवलेय. वडिलकीच्या जबाबदारीने विश्वमोहनने या मंगलकार्याची धुरा सांभाळलीय. विश्वमोहनच्या घरात पहिल्यांदाच असं मोठं कार्य होतंय.
मैथिलीच्या लग्नाच्या धामधुमीत मात्र एक धक्कादायक घटना घडते. आर्याचं अपहरण होतं आणि सुरु होतो एका सूडनाट्याचा प्रवास, ज्याचं रहस्य दडलेलं आहे १५ वर्षांपूर्वीच्या एका घटनेत.

असं कोणतं रहस्य आहे की ज्यामुळे आर्याचा जीव धोक्यात आला आहे ? हे रहस्य उलगडेल ? त्याचा आर्यावर काय परिणाम होईल ? विश्वमोहन आर्याला वाचवू शकेल ? आर्यला तिच्या स्वप्नातला  जोडीदार मिळेल ? या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी पाहायला विसरू नका - "आभास हा" ३० मे पासून सोमवार ते शनिवार रात्री .३० वा. फक्त झी मराठीवर.
'आभास हा' मालिका विद्याधर पाठारे यांच्या आयरिस प्रॉडक्शनची  निर्मिती असून आर्याच्या मध्यवर्ती  भूमिकेत  असणारी  अपूर्वा  नेमळेकर या मालिकेद्वारे पदार्पण करीत आहे. तिच्याबरोबरच चैतन्य चंद्रात्रे, लोकेश गुप्ते, गौरी सुखटणकर, अर्चना पाटकर, आणि  स्मिता तांबे  या मालिकेत  मुख्य  भूमिकेत आहेततसेच  इतर  महत्वाच्या  भूमिकेत सुचित्रा बांदेकर,मिलिंद फाटक, अजिंक्य जोशी, चैत्राली गुप्ते, विकास पाटील, संकर्षण कऱ्हाडे, अक्षय वाघमारे, मयूर खांडगे, राम कोल्हटकर,नीला गोखले आदी  प्रमुख  कलाकार  काम  करत  आहेत. तर  या मालिकेचे  दिग्दर्शन विनोद लवेकर  यांचे आहे